टीडब्ल्यूआर बायबल क्विझ काय आहे?

शोधण्यासाठी येथे क्लिक करा

टीडब्ल्यूआर इंडिया बायबल क्विझ ही भारतीय भाषांमध्ये बायबलचा सखोल अभ्यास आणि त्याची आवड निर्माण करण्यास उत्तेजन देणारी आहे. आम्ही गेल्या 11 वर्षांपासून बायबल क्विझचे यशस्वीरित्या आयोजन करीत आहोत. या यशाचे श्रेय मुख्यत: टीटीबीचे डॉ. जे. वर्नन मॅगी यांनी विकसित केलेलया देवाच्या वचनाच्या पद्धतशीर अभ्यासास दिले आहे आणि हा अभ्यास टीडब्ल्यूआर इंडियाकडे 100 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीडब्ल्यूआर बायबल क्विझमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक चर्चची अशी साक्ष आहे की अशा प्रकारे गहन व समृद्धतेने देवाच्या वचनाचा अभ्यास करणे हा एक अनोखा अनुभव होता. खरं तर, सन 2019 मध्ये संपूर्ण भारतभर सहभागी झालेल्या लोकांची संख्या 66,000 पेक्षा जास्त होती.

यावर्षी तर, यास आणखी एक पाऊल पुढे घेऊन जाण्याची आमची आशा आहे आणि खात्री आहे की हा कार्यक्रम जगभर पसरलेल्या भारतीयांपर्यंत पोहचला जाईल. अशा प्रकारे ऑनलाइन बायबल क्विझ कल्पनेचा उदय झाला. महामारी कोविड-19 च्या काळात सरकारच्या प्रतिबंधात्मक कायदे आणि नियमांच्या मर्यादेत राहून सेवाकार्य सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न असल्यामुळे आमच्या हेतूंना अधिक बळकटी आली.

आम्ही आशा करतो की या वार्षिक कार्यक्रमातील आपला सहभाग एक अद्भुत अनुभव असेल आणि यावर्षी आमच्याबरोबर 'निर्गम' चा प्रवास करीत असताना आत्मिकरीत्या पोषित झाल्याचे आपणांस समजून येईल. आपला सहभाग, तसेच आणि टीडब्ल्यूआर इंडियाच्या सेवाकार्यातील आपले सातत्याचे पाठबळ आम्हाला सुवार्तेची घोषणा करण्यास आणि देशभरातील विश्वासणाऱ्यांना बळकट करण्यास प्रोत्साहित करतो.

धन्यवाद

उपलब्ध भाषा :-

टीडब्ल्यूआर इंडियाची ऑनलाइन बायबल क्विझ 2020 ही 14 ​​भाषांमध्ये उपलब्ध आहे ज्यात भाषेच्या दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण लोकगटातील एक महत्त्वपूर्ण विभाग समाविष्ट आहे. यावर्षीच्या उपलब्ध भाषा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

English

हिन्दी

தமிழ்

తెలుగు

മലയാളം

বাংলা

मराठी

ਪੰਜਾਬੀ

ગુજરાતી

ಕನ್ನಡ

অসমীয়া

नेपाली

ଓଡ଼ିଆ

Kokborok


जर आपण यापैकी कोणातीही भाषा वाचू आणि समजू शकत असाल तर आपण क्विझमध्ये सहज सहभागी होऊ शकता. आपण नोंदणी करता तेव्हा आपणांस सर्वात सोयीस्कर असलेली भाषा आपण निवडली असल्याची खात्री करा.

नोंदणी शुल्क :-

एक वेळ नोंदणी शुल्क रुपये 50 आहे.

क्विझसाठी नोंदणी करताना नोंदणी फी भरणे आवश्यक आहे.

जर आपण भारताबाहेरील असाल आणि पैसे भरण्यास इच्छुक असाल तर कृपया लक्षात घ्या की आपल्याला फक्त भारतीय चलनात पैसे द्यावे लागतील. पेमेंट संबंधित आपणास कोणतीही अडचण येत असल्यास, कृपया वेबसाइटवर सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही संपर्क पर्यायांद्वारे मोकळ्या मनाने संपर्क साधा.

एकदा आपली नोंदणी पूर्ण झाली आणि टीडब्ल्यूआर इंडियाद्वारे पडताळणी झाल्यानंतर आपल्याला त्याचे पुष्टीकरण पाठविले जाईल आणि तसेच ऑनलाइन क्विझमध्ये तयारी आणि सहभागी होण्यासाठी अभ्यासाच्या ऑडिओ सामग्रीची लिंक तसेच मार्गदर्शक तत्त्वांची एक प्रत आपणांस पाठविली जाईल.